गझल...
ठरवून ऐनवेळी ...... केलास वार आहे
होऊन वाघ मी ही, भिडण्या तयार आहे...
करण्या हिशोब सारा मी ठेवल्यात नोंदी
समजून घे जरा तू, बाकी उधार आहे...
उंटावरून शेळ्या .... हाकून रोज जातो
कळण्या तुझी हुशारी, इतकेच फार आहे...
आणून आव खोटा, होऊ नकोस मोठा
ठरवून एक दिवशी, पडणार मार आहे...
गझलेत माणसांच्या, येतो प्रमोद जेव्हा
त्याच्याच लेखणीला तलवार धार आहे...
©®प्रमोद जगताप फलटणकर
संवाद - 8554857252