Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आज आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस.. म्हणे

बटाटा🥔 भजी

🥔साहित्य
बटाटे
हिरा बेसन
हळद पावडर
मीठ
ओवा
लाल तिखट

🥔कृती

बटाटा भजी करण्यासाठी सगळ्यात आधी बेसनाच्या पीठात मीठ, ओवा, लाल तिखट, पाणी आणि गरम तेलाचे मोहन घालून मिश्रण करून घ्या.
पीठ शक्यतो हिरा बेसन वापरावे जे अतीशय गुळगुळीत व बारीक असते ज्यामुळे भजी कुरकुरीत होतात

बेसनाच मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ नसाव

बटाटे स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घ्या.
(बटाट्याची साल काढली असता भजी जास्त कुरकुरीत होतात )
हे काप बेसनाच्या पीठात घोळवा.

कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात एकामागोमाग एक बेसन पीठ लावलेले बटाट्याचे काप तळून घ्या.

🥔तयार आहेत कुरकुरीत खमंग बटाटा भजी😋

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112026217
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now