#श्रावण
🌱अळूची ताकातली भाजी
श्रावण महिन्यात या भाजीला खुप महत्व असते
वेगवेगळ्या प्रसंगी कार्यक्रमात जेवणात अळूची भाजी हवीच
🌱नेहेमी अळूच्या भाजीत चिंच घातली जाते
ज्यामुळे त्याचा खाजरेपण कमी होते
व खाताना खवखवत नाही
मी ईथे ताक वापरले जे चिंचेचे काम करते
व चवही छान येते
🌱साहित्य
एक लहान जुडी आळु
पाव वाटी तूर डाळ
अर्धी वाटी शेंगदाणे
एक वाटी आंबट ताक
कढीलिंब
चार लाल मिरच्या
फोडणीचे साहित्य
ओले खोबरे
दोन चमचे डाळीचे पीठ
गुळ मीठ चवीनुसार
काळा मसाला, हळद
काजु सात आठ
🌱कृती
अळू सोलून बारीक चिरुन घ्यावा
तूर डाळ व शेंगदाणे घालून कुकरला उकडून घ्यावा
🌱गार झाल्यावर त्यात दोन चमचे डाळीचे पीठ घालून चांगले घोटून घ्यावें
🌱एका पातेल्यात ही भाजी घालून
यात खोबरे, गुळ,हळद,मीठ, काळा मसाला, ताक व जरुरीपुरते पाणी घालून छान शिजवून घ्यावी
🌱एका छोट्या कढईत तेल घालून प्रथम थोडे काजु तळुन भाजीत मिसळावे (भाजीला शाही चव येते)
🌱हिंग मोहरी फोडणी करून
त्यात चार लाल मिरच्या व कढीलिंब घालून
फोडणी भाजीवर ओतावी
भाजी सारखी करून आणखी पाच मिनीटे गॅस वर ठेवावी
🌱 घरच्या ताकाला थोडी मलई असतेच त्यामुळें भाजी मलईदार होते